जनतेज न्युज

स्वायत्त विद्यापीठातील विदर्थ्यांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी जाहीर आंदोलन

प्रतिनिधी, मुंबईत : मुंबई विद्यापीठंतर्गत होणाऱ्या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. तर काही स्वायत्त महाविद्यालय देखील उन्हाळी सत्रातील   परीक्षा ऑनलाईन घेणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विनंती करून सुद्धा काही स्वायत्त महाविद्यालये परीक्षा ऑफलाईन घेत आहेत.

मुंबई मधील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले आहे तर परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेण्यात याव्या ही स्वायत्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबई प्रदेश यांच्या वतीने या मागणीचा शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये कोणतीही तफावत होऊ नये यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करत आहे.