प्रतिनिधी , वर्धा : शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी कुणालाही विश्वासात न घेता जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अवैध नियुक्त्या केल्या. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी विश्राम गृहात तुषार देवढे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना वर्धा यांनी 15 मार्चला पत्रकार परिषदेचे आयोजन केले आणि जिल्हा संपर्कप्रमुख अनंतराव गुढे यांना पदावरून काढून टाकण्यात यावे आणि मुंबईवरून चांगले संपर्कप्रमुख दिल्यास फायदा होईल असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,.यासोबत एकूण दहा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केले आहेत.
