जनतेज न्युज

क्रीडा भवनाच्या मैदानात रंगला लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी बॅडमिंटन सामना

प्रतिनिधी , वर्धा : खासदार क्रीडा महोत्सवाचा निमित्ताने जिल्हा क्रीडा भवन येथे विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने खासदार रामदास तडस,जिप उपाध्यक्ष वैशाली येरावार विरुद्ध जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, असा लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गात उदघाटन प्रसंगी बँटमींटनचा प्रेक्षणीय सामना खेळला गेला.या सामन्याचा लोकप्रतिनिधीसह अधिकारी वर्गाने आनंद लुटला हे मात्र विशेष !