जनतेज न्युज

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुलाब फुले देऊन सत्कार

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा हा पंधरा हजारांच्या घरात गेला असून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचार बंदी लागू केली असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात नगरपरिषद प्रशासन, तहसील विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने मास्क न वापरणाऱ्या दुचाकीस्वार व चारचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे ,ठाणेदार प्रदीप साळुंके व मुख्याधिकारी महेश वाघमोडे ह्या तिन्ही अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, सोबतच अशा नागरिकांना गुलाब फुले देऊन देखील सत्कार करण्यात आला. यावेळी एस टी बस मधील प्रवाश्यांना देखील मास्क वापरने , शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.