जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत – अबू आझमी

प्रतिनिधी , मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लीम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे अबू आझमी यांनी म्हटले.