जनतेज न्युज

टॅक्सी चालकांचे मिटर झाले 25 रुपये पण बहुतेक ग्राहक देताहेत 22 रुपये याप्रमाणेच दर…

प्रतिनिधी , मुंबई : इंधन दरवाढ नंतर रिक्षा व टॅक्सी चालकांची भाव वाढ झाली. टॅक्सी चालकांसाठी दर 22 रुपयांवरून 25 रुपयांपर्यंत आले
परंतु प्रत्यक्षात मात्र टॅक्सी चालकांना अजूनही 25 ऐवजी ग्राहकांकडून बहुतेक रीत्या 22 रुपये मिळत आहे. त्याची विचारपूस करण्यावर असे समजले की त्यांना अजूनही बहुतेक ग्राहकांना मीटर वाढ झालेली आहे हे माहिती नसून ते टॅक्सी चालकांसाठी वाद घालून आम्ही पंचवीस च्या ऐवजी 22 रुपये देणार अशी भूमिका बजावत असताना दिसत आहेत…
यावर उपाय म्हणून टॅक्सी चालकांनी आता त्यांचा रेट कार्ड मध्ये दरपत्रक हे सर्व ग्राहकांना दाखवण्यास सुरुवात केली असून यावर सुद्धा काही ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत तर बहुतेक ग्राहक हे जुन्या मीटर प्रमाणे त्यांना त्याचे भाडे देत आहेत.
या मुळे टॅक्सी चालकांचा धंदा फारच कमी प्रमाणात होताना दिसत आहे.