प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ पाठोपाठ अमरावती शहराचं आरोग्य व स्वच्छता सांभाळणाऱ्या अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, यात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले आहे.कोरोना बाधिता मध्ये झोन क्रमांक 1,2,3 चे सहायक आयुक्त,शहर अभियंता,सिस्टीम मॅनेजर,विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर,डॉक्टर,लिपिक आदींचा समावेश आहे. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा चांगलाच ताण येत आहे.
