जनतेज न्युज

कोविड साहित्याच्या केलेल्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत भाजपचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

प्रतिनिधी , मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसुन भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. कोविड -१९ च्या नावाखाली केलेल्या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप करत चौथा दिवस भाजपा आमदारांनी सभागृहाच्या बाहेर ओदांलन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदारांतर्फे आंदोलना दरमान्य कोव्हिड-१९ मुळे मुत्यु झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.