प्रतिनिधी, नांदेड : मुदखेड पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात चिखलमय व जलमय असल्याने या साचलेल्या पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डासांमुळे जनावरे आजारी पडतीलच परंतु यामध्ये नागरिकांच्या आरोग्यही धोक्यात येईल असे नागरिकांतून बोलले जात आहे.संबधित अधिकाऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर लक्ष दिले असते तर दवाखाना परिसर चिखलमय आवस्थेत राहिला नसता.पशुवैद्यकीय दवाखान्याला लागुनच ग्रामीण रुग्णालय आणि दिवानी न्यायालय असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित अधिकारी काय नियोजन लावतील याकडे तालुक्यातील व शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
