जनतेज न्युज

रखडलेल्या रेल्वे मार्गाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी; विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचं लक्षवेधी आंदोलन

प्रतिनिधी ,बीड : मागील अनेक वर्षांपासून नगर-बीड-परळी आणि सोलापूर-बीड-जळगाव या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. आणि हेच काम जलद गतीने सुरू करण्यात यावं, या मागणीसाठी आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रतीकात्मक रेल्वे डब्याच इंजन दोरीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणण्यात आलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कचेरी बाहेर जोरदार घोषणाबाजी करत या प्रश्नाकडे लक्ष वेधलं गेलं. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारने 50 टक्के उचलला आहे. परंतु राज्य सरकार रेल्वेला पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानं हा वाटा केंद्राने उचलून तात्काळ रेल्वेचे काम सुरू करावं, त्याबरोबरच आज पर्यंत झालेल्या रेल्वे मार्ग खर्चाचा आराखडा जनतेसमोर मांडावा, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. सरकार हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात असमर्थ असेल, तर एमआरइजीएस मार्फत सदरील काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.