जनतेज न्युज

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यावर गावकऱ्यांकडून कौतुकाची थाप.

प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील आजेगांव आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गावकरी एकवटले असून आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
मागील दोन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच होता परंतु आरोग्य विभागाने व प्रशासनाने उत्कृष्ट कार्य करून सध्या करोणाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला व आरोग्य विभागाला यश आले असून कोरोणा काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायती व नागरिक सध्या सरसावल्याचे दिसून येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज अाजेगांव ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी अाजेगांवच्या सरपंच सौ राणीताई नंदकिशोर काळे,उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील,ग्रामसेवक आदी यावेळी उपस्थित होते