जनतेज न्युज

बुलडाण्यातील समृद्धी महामार्गावर नऊ मजुरांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी…

प्रतिनिधी, बुलडाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ एका परिवहन मंडळाच्या बस ला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्पर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात 9 मजूर ठार झालेत तर 12 मजूर जखमी झाले आहेत ,जखमीपैकी 05 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी मजुरांवर किणगाव राजा , सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलंय आहे, समृद्धी महामार्गाच्या कामावरील हे टिप्पर लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला , अपघात इतका भीषण होता की टिप्पर पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दाबल्या गेलेत. तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे…