जालना: प्रतिनिधी , बुलडाणा : प्रतिनिधी , उस्मानाबाद : प्रतिनिधी , सातारा : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी आज सायकलने कार्यालयात पोहचलेय. सर्व कर्मचारी आणि अधिकारी आकाशवाणी चौकात एकत्रित आले आणि तेथून महापालिकेत पोहचले. नागपूरात वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा उपक्रम राबविला. 1984 साली 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री युनियन कार्बाइड च्या विषारी वायू गळतीमुळे असंख्य नागरिकांचा मृत्यु झाला होता. त्यामुळं 2 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय पर्यावरण नियंत्रण दिवस म्हणून पाळल्या जातो. त्यामुळं शहरातील प्रदूषण नियंत्रित राहावं यासाठी नागपूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकल ने कार्यालयात येत आजचा दिवस हा ‘सायकल दिवस’ म्हणून पाळावा असा संदेश दिला.
