जनतेज न्युज

महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांपासून पासून सावध होणं गरजेचं; खासदार अरविंद सावंताची भाजप वर टीका

प्रतिनिधी , अमरावती : उत्तरं प्रदेश मध्ये फिल्म इंडस्ट्री उभारण्याची घोषणा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबई मध्ये बॉलिवूडच्या लोकांसोबत भेट घेनार आहे. बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवऊन मुंबईच महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील जोरदार टीका केली आहे. या फिल्म इंडस्ट्रीला जन्म हा मराठी माणसाने दिलेला आहे आणि ही फिल्म इंडस्ट्री दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुळावर उठणार या लोकांपासून सावध होण्याची गरज असल्याची टीका शिवसेनेचे खासदार रविंद्र सावंत यांनी अमरावतीमध्ये केली.