मातंग समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याकरिता
प्रतिनिधी : पुणे , मातंग समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याकरिता लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले .
मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ , ब , क , ड प्रमाणे वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतत्रं आरक्षण द्यावे . संसद भवन व विधान भवन या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे बसविण्यात यावेत . संगमवाडी येथील लहुजी वस्ताद यांचे स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत . साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा , लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्या , मातंग समाजाला सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी स्वतत्रं आयोग नेमण्यात यावा , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची सर्व कर्ज माफ करून नव्याने त्वरित कर्ज माफ करून नव्याने त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावीत , मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे ., बारामतीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा .
समाजाच्या मागण्याचा लवकरात लवकर विचार करून सोडविण्यात याव्यात . अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल .
या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास सकट , महिला अध्यक्षा आशा साळवे , शहर अध्यक्ष सनी साळवे , कोअर कमिटी अध्यक्ष नामदेव घोरपडे ,शहर सचिव अविनाश खिलारे , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजू आवळे , पुणे जिल्हा अध्यक्षा लोपाताई भगत , उपाध्यक्षा सुशीला अडागळे , विजय सकट , सचिन कुचेकर , किशोर कसबे , महादेव भवाळ , मोहन वाघमारे , फुलाताई थोरात , सुरेखा शेलार , विजय गाडे , राजाभाऊ कांबळे , दत्ता धडे व धनराज मुरगुंड आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
आपल्या मागण्या लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवून त्याचा पाठपुरावा करून सोडविण्याचे आश्वासन पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले .
सोबत – पुणे जिल्हाधिकारी यांना दिलेली निवेदन प्रत जोडली आहे .
