जनतेज न्युज

संजस राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी

प्रतिनिधी , पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
त्या गुरुवारी वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.