जनतेज न्युज

संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येतून मला बदनाम करण्याचा डाव-राज्यमंत्री बच्चू कडू…..

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्याय मिळण्याची मागणी केली होती यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.त्यांनी माझ्या नावे जी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहली ती सहानुभूती आणि न्यायाच्या आशेने लिहली होती.जर मृत्यू पूर्वी आम्हाला माहीत असत तर ती आत्महत्या आम्हाला थांबवता आली असती.परन्तु मरतेवेळी बच्चू कडू आपल्याला न्याय मिळून देऊ शकत या आशेने मला उद्देशून ती चिठ्ठी त्यांनी लिहली अस राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले…परंतु काही विरोधक त्याच राजकारण करून.शेतकऱ्याच्या म्रुत्यु नंतर त्याच्या टाळू वरच लोणी खाल्यासारखा हा प्रकार आहे.या शेतकरी आत्महत्यातून बच्चू कडू यांना कस बदनाम करायचं असा डाव विरोधकांचा आहे..या शेतकरी आत्महत्या वर जे काही चौकशी लावायच्या आहेत त्या लावु आम्ही त्या शेतकऱ्याला पूर्ण पणे न्याय देऊन त्या कुटूंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहून त्यांच्या कुटूंबाला भेट देऊ असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे..