प्रतिनिधी , भंडारा : कोव्हीड-१९ (कोरोना) रोगाच्या संकटात संरक्षणाचा एक भाग म्हणुन संपुर्ण देशात (लॉकडाऊन) संचारबंदी करण्यात आली होती.त्याचा मोठा विपरीत परिणाम देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच मात्र सर्वसामान्य नागरीकांवर सुध्दा दिसुन आला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले.तर काहींना नाईलाजास्त जिवासाठी स्वतःचे काम सोडावे लागले.शहरामध्ये हातावर पोट असलेल्या पथवि क्रेत्यांना तर लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला.पथवि क्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये घरातच राहावे लागले.अशा अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.मात्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथवि क्रेत्यांना दिलासा मिळाला असुन ही योजना पथवि क्रेत्यांसाठी ‘नवसंजीवनी’ ठरीत असल्याचे चित्र सध्या शहरांमध्ये दिसुन येत आहे.
पथवि क्रेता सहाय्य अभियानाअंतर्गत ‘आर्थिक सक्षमीकरण…पथवि क्रेत्यांचे सबलीकरण…’ करण्यासाठी ही योजना जिल्हयात राबविली जात असुन आजघडीला जिल्हयातील २ हजार १७० पथवि क्रेत्यांनी या योजनेकरीता आवेदन अर्ज सादर केले असुन प्रत्येकी १० हजार रूपये अशा जवळपास २ हजारांपेक्षा अधिक लाभा र्थ्याना एकुण ९१ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज मंजुर करून सदर रक्कम लाभा र्थ्याच्या बँक खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत भंडारा शहरातील ७२५ लाभा र्थ्यानी अर्ज सादर केले असुन चारशे च्यावर लाभाथ्र्यांना या योजनेअंतर्गत ३४ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.हे विशेष.
कोरोना आणि लॉकडाऊनचा विविध घटकांवर परिणाम झाला.अर्थव्यवस्था डळमळीत झाली.त्यातुन मार्ग काढत एकेक घटकाला उभारी देण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारने पथविव्रेâता सहाय्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी योजना नगरपालीका,नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविली जात आहे.या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयाला २५२० पथवि क्रेत्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत पथवि क्रेत्याला ३ टक्के व्याजदरावर १० हजार रूपयाचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी बँकेतुन दिले जाते आणि तेही ७ टक्के अनुदानासह. विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणा-यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे.
