जनतेज न्युज

कोरोनामूळे बैकिंग क्षेत्राला मोठ्ठा फटका नाही,जाणकारांचे मत… मात्र कर्जात थकीतची परिस्थिती..

प्रतिनिधी , बुलडाणा : जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारी आजाराच्या संकटाने सगळ्यांच क्षेत्रात आर्थिक फटका बसला आहे.मात्र देशाचा आर्थिक पाया असलेल्या बैकिंग क्षेत्राला मोठ्ठा फटका बसला नसल्याचे बैकिंग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे असून मात्र कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ठेवी आल्या नसल्याने व वाटलेल्या कर्ज प्रकारणात थकीतचे प्रमाण वाढल्याने बैंका आणि पतसंस्था यांच्या नफ्यात तोटा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तर अनलॉक झाल्यापासून सध्या बैकिंग क्षेत्रातील बैंका आणि पतसंस्था सुरळीत मार्गावर येत असल्याचे दिसत आहे.
कोरोना या महामारीच्या संकटामुळे देशात 24 मार्च पासून ऑगस्ट पर्यंत पाच महिने लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.अनेक उद्योगधंदे बंद होते.व्यापार बंद होता.लग्न व मोठं-मोठे समारंभ घेण्यात येत नव्हते.या शिवाय अनेकांच्या हाताला काम नव्हते.यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती नाजूक या काळात झाली होती.लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व व्यवसाय यांना मुभा देण्यात आली होती.व्यवसाय तर सुरू होते मात्र नागरिक बाहेर न आल्याने सुरू असलेले व्यवसाय यांना ही आर्थिक चणचण भासली.अत्यावश्यक सेवेत प्रामुख्याने बैकिंग क्षेत्रातील बैंका आणि पतसंस्था यांचा देखील समावेश होता.मात्र या क्षेत्राला कोरोनाचा मोठ्ठा फटका बसला नसून बँकांना भविष्यात याचा धोका नसल्याचे मत सेंट्रल अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी व्यक्त केले आहे..