प्रतिनिधी , लातुर : देशभरात आज भारत बंद ला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातही संघटना, राजकीय पक्ष यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदीवला होता. कृषी विधेयक हे शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. राजधानी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शने करून या बंदला पाठींबा दिला जात आहे. लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिवाय मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
