प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही पावसाच्या हलके थेंब ही पडले आहेत. हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. तर द्राक्ष पीक कुजू न शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच कोटयवधी रुपयाचे नुकसान झाले होते.. त्यातून शेतकरी कसा तरी सावरतो आहे.. त्यातच ढगाळ वातावरण आणि आज झालेल्या पावसाच्या सरीने हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया जाईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.आजच्या पावसाने द्राक्ष घडात पाणी साचून घड कुजू शकतात असे शेतकऱ्यानं सांगितले..
