जनतेज न्युज

सातारा जिल्ह्यातील धामणेर गावातील शेतकऱ्याने म्हैशीचा ३० वाढदिवस केला साजरा

प्रतिनिधी , सातारा : आजकाल आपण अनेकांचे वाढदिवस साजरा करताना पाहिले असेल पण म्हशीचा वाढदिवस म्हटलं की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.हो ३० वा म्हैशीचा वाढदिवस….सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावचे संतोष क्षीरसागर हे दरवर्षी १४ जानेवारीला आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करतात..आजकाल प्राणीमात्रांवर प्रेम करणारे हल्ली कमीच दिसतात. .असं म्हटलं जातं शेतकरी स्वता उपाशी राहतो परंतू आपल्या पाळीव जनावरांना तळहाताच्या पोटाप्रमाणे जपतो.म्हणूनच त्या बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. माणूस माणसाचा वैरी झालेला आपण अनेक ठिकाणी पाहतो पण संतोष क्षीरसागर या शेतकऱ्यासारखे अनेक लोक आजही आहेत जे आपल्या मुक्या जनावरांवर प्रेम करतात त्यामुळे अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा तर होणारच
३० व्या वाढदिवसाला मालकाच्या डोळ्यात आले अश्रू समाजामध्ये मुक्या प्राण्यावर प्रेम करणारे लोक कमीच असतात आपण वाढदिवस अनेक लोकांचे साजरे करतो. परंतू असा वाढदिवस जो समाजामध्ये कमीच पहावयास मिळतो शेतकरी कुटुंबातील संतोष क्षीरसागर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या म्हैशीचा ३० वा वाढदिवस केक कापून , पूजा करून साजरा केला म्हशीच्या वाढदिवसानिमित्त कातकरी समाज, मतिमंद मुलांना खाऊ वाटप ,अनाथाश्रमातील मुलांना अन्नदान अशा प्रकारे म्हशीचा वाढदिवस साजरा केला. ज्या म्हशीला घेतले अन् घरात म्हशीचे आगमनाने भरभराटी आली त्यामुळे त्यांनी म्हशीचे नाव “राणीलक्ष्मी “ठेवले. आपल्या आईच्या आठवणी प्रमाणे तिची शेवटपर्यंत सेवा करत राहणार. राणी ऊर्फ लक्ष्मी ही म्हैस माझी आई आहे आपल्या म्हशीच्या वाढदिवसाने संतोष क्षीरसागर यांचे डोळे पाण्याने गहिवरले