जनतेज न्युज

साथीच्या आजारापासून सुरक्षित आरोग्यासाठी एक कोरडा दिवस पाळा – जिल्हा हिवताप अधिकारी

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले असल्याने खाजगीसह, सरकारी दवाखाने देखील रुग्णांनी गच्च भरलेली दिसून येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी नेहमीच्या पाणी साठवण साहित्याची पाहणी करावी, किंवा डासाची उत्पत्ती होईल असे सर्व स्त्रोत वारंवार रिकामी करावेत, शक्य झाल्यास आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.आणि सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, आपली तपासणी करून योग्य उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण यांनी केले आहे.