प्रतिनिधी, औरंगाबाद : आज रविवार 20 मार्च रोजी शहरातील क्रांती चौक परिसरात कार्यशाळा संपन्न झाली असून, शहरातील व्हर्सटाईल टेक्नॉलॉजी यांच्या वतीने 20 मार्च रोजी हॉटेल ग्रँड मोदी क्रांती चौक येथे एक दिवसीय इथिकल हॅकिंग व सायबर सेक्युरिटी या विषयावर ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते.यामध्ये नागरिकांना एक दिवसाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आली असून यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे,
अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे. या कार्यशाळेत पोलीस उपअधीक्षक विशाल दुमे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळा सर्वांसाठी खुली असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सदरील कार्यशाळेचा लाभ आज रोजी घेतला आहे, विवेक कुमार राजेश वर्मा व कृष्ण वर्मा हे 2015 पासून हॅकिंग व सायबर सेक्युरिटी वरती कार्य करत असून आजवर असंख्य औरंगाबादकरांना त्यांनी जनजागृती च्या माध्यमातून आर्थिक फसवणूक पासून कसे दूर राहता येईल याचे अत्यंत साधे सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले असून.सदरील कार्यशाळेत ऑनलाईन पद्धतीने होणारी फसवेगिरी, मोबाईल हॅकिंग, अशा विविध विषयांवर ती कार्यशाळा माहिती देण्यात आली, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांना सदरील संस्थेच्या वतीने प्रमाणपत्रही देण्यात आली आहे सदरील कार्यशाळा आज रोजी क्रांती चौक येथील ग्रांड मोदी हॉटेलच्या सभागृहात सदरील कार्यशाळा संपन्न झाली आहे.
