प्रतिनिधी, वर्धा : आज चंद्रा आर्ट अँकेडमी गणेश नगर बोरगाव मेघे येथे चंद्रा आर्ट अँकेडमी द्वारा आयोजित नृत्य प्रवाह भरतनाट्यम नृत्य कलाविष्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्यमातून नृत्य विशारद भरतनाट्यम नर्तक रुषकेश पोहनकर यांचे भारतीय शास्त्रीय नृत्य कला या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भरतनाट्यम आविष्काराचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय शास्त्रीय नृत्याबरोबरच भारतीय पारंपारीक लोकनृत्य शिक्षण घेऊन त्यात भरतनाट्यम नर्तक रुषकेश पोहनकर संशोधन यांनी संशोधन केले. भारतात व परदेशात विविध महोत्सवामध्ये त्यांनी एकल नृत्य सादर करून प्रेक्षकांची भरपूर दाद मिळवली. त्यांनी शास्त्रीय नृत्य कला या विषयावर व्याख्यान केले तसेच त्यांचे काही अनुभव सुध्दा त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाट्य व नृत्य दिग्दर्शक मनीष खडतर, शिल्पकार अशोक वहीवटकर,चित्रकार लतीफ खान,शास्त्रीय गायिका खुशबू कठाने,रेडिओ निवेदिका वैशाली जोगे,पत्रकार वृनाल ढोक,आरोग्य विभाग अधिकारी रत्ना शहाणे, जि.प.शिक्षक अनिल खंगार यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
