जनतेज न्युज

चला चिमण्या पाहूया हा अनोखा उपक्रम शहरातील गोगाबाबा टेकडी येथे संपन्न

प्रतिनिधी, औरंगाबाद : जागतिक चिमणी दिनानिमित्त आज रविवार 20 मार्च रोजी एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी औरंगाबादच्या  वतीने गोगाबाबा टेकडी परिसरात “चिमणी निरीक्षण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होते. चिमणी निरीक्षणासाठी येणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील सोनेरी महलच्या मुख्य गेटसमोर सदरील कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले होते. यासाठी सदरील संघटनेचे गिरीधर पांडे आणि कुणाल विभांडिक  यांनी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करून गोगाबाबा टेकडी परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यासाठी आधुनिक दूरबीन लावण्यात आल्या होत्या यातून नागरिकांनी विविध पक्षांचे निरीक्षण करण्यात आले आहे.पक्षीप्रेमीनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी पक्षीप्रेमी यांचे स्वागत करून त्यांना पक्षांच्या संदर्भात विविध माहिती या वेळी देण्यात आली आहे. सदरील कार्यक्रम आज रोजी गोगाबाबा टेकडी या परिसरात संपन्न झाला.