जनतेज न्युज

स्लग:वाशिम शहरात साकारले लॉक डाऊन गार्डन

प्रतिनिधी , वाशिम: कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन हा शब्द हा नऊ महिन्याच्या काळात प्रचंड वापरल्या गेला याच शब्दावरून वाशिम शहरातील “ड्रीम लँड सिटी” या नवीन वसाहती मधिल नागरीकांनी लोकसहभागातून निर्माण केलेल्या बागेला “लॉक डाऊन गार्डन ” असे नाव देऊन त्या मध्ये नववर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम ठेऊन नगरवासीयांनी 2021 या नववर्षाचे स्वागत केले. या वसाहती साठी असलेल्या मोकळ्या जागेवर लॉक डाऊन च्या काळात वृक्ष लावून संगोपन करण्यात आले तसेच लोकसहभागातून जमा झालेल्या लोकवर्गणीतून बसण्यासाठी बेंच, मुलांसाठी क्रीडा साहित्य आणून हे गार्डन सुरू करण्यात आले आणि येथे नववर्षाचे स्वागत करीत ह्या गार्डनचा लोकार्पण सोहळा पार पडला.