प्रतिनिधी , केंद्र सरकार हिमाचल प्रदेश च्या विकासासाठी कटिबद्ध असून हिमाचल प्रदेश मध्ये 5 हजार करोड रुपये खर्च करून एक मोठ्या टनेल चा कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली । ते आज पदमगंधा प्रतिष्ठान, नागपूर च्या वतीने दिला जाणारा ” नलिनी बाळकृष्ण देवपूजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार ” स्वीकारतांना मंचावरून बोलत होते । यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तामिळनाडू चे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे ,कांचन ताई गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते । आत्तापर्यंत आपण 5 लाख करोड चे कामे देशभरात केले असून देशाचा विकासासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले । नागपूरच्या विकासासाठी महत्वाच असलेल्या नागनदीचा विकास करण्यात येत असून यासाठी तब्बल 1700 कोटी रुपये मंजूर झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। माजी मुख्यमंत्री यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपुरातील फुटाळा तलाव येथे जगातील सर्वात सुंदर असे म्युझिकल फाऊंटेन साकारले जात असून येत्या 15 ऑगस्ट ला या म्युझिकल फाऊंटेन चे लोकार्पण करण्याची आमची योजना असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले । तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त करीत नितीनजी मध्ये जिद्द, परिश्रम आणि नाविन्यपूर्ण कामे करण्याची कल्पकता असल्यामुळे ते आज देशात सर्वात यशस्वी मंत्री ठरल्याचे सांगितले । यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीही नितीन गडकरी यांचा गौरव करीत नितीन गडकरी हे तामिळनाडू च्या विकासात मोलाची भूमिका वठवीत असल्याचे सांगितले
