जनतेज न्युज

अमरावतीत एसटीबस पुलाखाली कोसळली, 20 ते 25 जण गंभीर जखमी

प्रतिनिधि , अमरावती : नागपूर वरून वरुड येथे प्रवासी घेऊन येणारी एसटी बस अमरावती जिल्ह्यातील वरुड जवळील ढगा गावाजवळ ट्रॅक्टरला धडक लागल्याने यात पुलाखाली एसटी बस कोसळून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे,या ठिकाणी मदत कार्यासाठी स्थानिक आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, एसटी बस ही नागपूर येथून वरुड येथे असतांना समोरून एक ट्रॅक्टर आला तर हा रस्ता लहान असल्याने तर पूलाला मजबूत कठळे नसल्याने काटोल डेपोची बस थेट पुलाखाली कोसळली त्यामुळे या अपघातात बस चालकाचा हात तुटून खाली पडला आहे तर प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदत कार्य केले…तर घटनास्थळी तास भरा पासुन वाहतूक ठप्प आहे…

Xxàआपàa