जनतेज न्युज

मकर संक्रांतीचे औचित्य साधून इस्लापूर येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने हळद आणि उसाचे लावले लग्न.

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील इस्लापुर येथे आर्य वैश्य समाज हा मकरसंक्रातीच्या निमित्ताने दरवर्षी कुठल्या ना कुठल्यातरी सामाजिक उपक्रम राबवत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेत असतो गेल्यावर्षी या आर्य समाजाने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्ष लागवडीसाठी महिलांना वृक्षरोपणाचे वाटप केले होते.या वर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू वाचा कार्यक्रमानिमित्त हळद आणि ऊस ही वनस्पती सदैव निरोगी आहे हळद ही माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक औषधी गुणधर्म असलेली वनस्पती असून ती विविध आजारावर चालते आणि तिचा आपण रोज खाण्यात देखील वापर करतो अशा ऊस आणि हळदीचे लग्न लावले आणि या देशावर कोरोणाचे संकट आले असता ते संकट दुर होवो आणि सदैव निरोगी हळदी सारखे हा देश राहो या साठी हळद आणि उसाचे लग्न लावल्याचे सागण्यात आले.