जनतेज न्युज

अंकलखोप येथे १८ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळुन खाक लाखो रूपयाचे नुकसान…

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप येथिल १८ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळुन खाक झाला आहे… या परिसरात सोनहिरा साखर कारखान्याचे वतिने ऊस तोडणी मशिनाच्या सहाय्याने सुरू होती… या मशिनचा धक्का विज वाहक तारांना लागला… त्यामुळे विज वाहक तारांचे घर्षन होऊन तोडणीला आलेल्या ऊसाला आग लागली… ही घटना दुपारी झाल्यामुळे आगीच्या ज्वाला प्रचंड होत्या… वारा ही मोठा असल्यामुळे आग परिसरातील ऊसाच्या क्षेत्रात परसरत गेली… अनेक शेतकरी यांनी आग विझवण्याच्या भरपुर प्रयत्न केला… पण लगतचे सर्व ऊसाचे पिक संपल्यावरच आग शांत झाली…
या आगीत दत्तात्रय बाळासो सावंत ३ एकर, संभाजी आनंदा गडदे २.५ एकर, दिपक शामराव बुवा ३ एकर, सुर्यकांत बाळासो गडदे २.५ एकर, रामचंद्र दाजी चौगुले २.५ एकर, शिवाजी भिकाजी भोई २.५ एकर, बाबासो आगीने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाचे क्षेत्र आहे… या आगीमुळे या शेतकरी वर्गाचे साधरण २ हजार टन ऊसाचे नुकसान झाले आहे…