प्रतिनिधी , सांगली : केंद्र सरकार दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना
भविष्यात अदानी, अंबाणीचे गुलाम होणार असे वाटू लागल्यानं आंदोलन पुकारले आहे, त्यामुळे अखिल भारतीय संघर्ष समनव्य समितीच्या वतीने 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलनाची घोषणा कऱण्यात आलीय अशी मााहिती माजी खासदार राजूू
शेट्टी यांनी दिलीय..सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 8 तारखेला शेतकरी आपला शेतीमाल विकणणार नाही, सर्व व्यवहार बंद ठेऊन शेतकऱ्यांना पाठींबा द्यावा असे आवाहन ही शेट्टी यांनी।केले आहे. आम्ही आतापर्यत पंतप्रधान, कृषी मंत्र्यांना पत्र लिहले, पण उत्तर आले नाही. सरकारने शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खंदक खोलले,
पंजाब, हरियाणा च्या शेतकऱ्यांचे फक्त हे आंदोलन नाही. भारता मधील सर्व शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे, त्यामुळे या बंदला देशभरातुन प्रतिसाद मिळेल अशी आशा यावेळी शेट्टीनी व्यक्त केली.
असे कायदे करून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जातोय , अनेक बुद्धिवादी लोकांनी आपले पुरस्कार देखील परत करून या आंदोलनाला पाठींबा दिलाय असेही शेट्टी म्हणाले.
