जनतेज न्युज

स्‍टेजवर साफसफाई करणारा युवराज ‘इंडियन आयडॉल’च्या रंगमंचावर

गाण्याच्या ओढीने सावद्याचा तरुण रिअॅलिटी शोच्या मंचावर बनला सफाई कामगार , नंतर झाला अंतिम १५ मधला स्पर्धक ….
केळी कामगाराच्या मुलाची स्वप्नपुर्तीसाठी धडपड …

प्रतिनिधी , जळगाव : प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि तिला मेहनतिची जोड असेल तर परिस्थिती ही अनुकुल होत जाते असे म्हणतात . जळगाव जिल्हातील रावेर तालुक्यातील सावदा या शहरातील युवराज कैलास मेढे या तरुणाच्या बाबतीत ही तेच घडले . गाण्याच्या ओढीने थेट इंडियन ऑयडालच्या सेटवर काम करता करता १२ व्या सिझनमध्ये त्याने स्वतःच ऑडिशन दिली . अंतिम १५मध्ये तो निवडला गेला ( शनिवार ) २८ नोव्हेंबर त्याचा सहभाग असलेला भाग प्रसारित झाला . सावदा येथे कैलास देवराम मेढे व त्यांची पत्नी ममता सह केळी कामगार म्हणुन मजुरी करतात . त्यांचा युवराज हा मुलगा लहानपणापासुन गाण्यासाठी अक्षरश : वेडा झालेला गाण्याच्या वेडाने पोट भरणार नाही हे आई वडिल समजावुन सांगत होते पण युवराजच्या ते पचनी पडत नव्हते .१२वी पर्यंत शिक्षण घेवुन त्याने रोजगाराच्या नावाने सावदा गाव सोडले आणि थेट गेला मुंबईला . तिथे भले सफाई कामगार म्हणुन काम करेल , पण गाण्याच्या सहवासातच राहील ही त्याची जिद्द होती . प्रचंड ईच्छाशक्ती आणि कामाच्या शोधासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्याला इंडियन ऑयडालच्या सेटवर सफाई कामगार म्हणुन नोकरी लागली . गेल्या दीड वर्षात युवराजने त्या सेटवर संगीत क्षेत्रातील महान व्यक्तींकडुन एकलव्या प्रमाणे प्रशिक्षण घेतले .सेटवरील प्रशिक्षक सहभागी स्पर्धकांना काय सुचना करतात हे युवराज लक्षपुर्वक ऐकत होता आणि स्वतःला त्यानुसार घडवित होता .१२ व्या सीझनसाठी नोंदणी सुरू झाली आणि आपण ही ऑडिशन द्यावी हा निर्णय त्याने घेतला .पाहिल्या भागात त्याने “खेळ मांडियेला ” हे मराठी गाणे सादर केले आणि परिक्षकांसह उपस्थित अन्य स्पर्धक ही भारावुन गेले . इंडियन आयडॉल म्हणुन निवड होणे ही तर त्याच्यासाठी खुप महत्वाची गोष्ट आहे . ती लढाई मोठी आहे आणि त्यासाठी तो आपले सर्वस्व देईल असा विश्वास त्याच्या आई वडिलांना आहे .ऑनलाईन नोंदणी करुन तो परिक्षकांसमोर गेला तेव्हा ऑडिशन घेत होते , प्रख्यात गायिका नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया ऑडिशनसाठी समोर उभ्या असलेल्या युवराजला नेहा कक्कर यांनी ओळखले व त्याचे कौतुक केले. युवराज च्या आई व वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया जाणुन घेऊयात…..