प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील धामणा बु येथे गत काही दिवसांपासून माकडांनी हैदोस घातला असून, गावकरी त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतातील नदी,नाले व पाण्याचे स्त्रोत पूर्णतः कोरडे झालेले असतात त्यामुळे माकडे, पशू पक्षी यांना पिण्यास पाणी मिळत नाही, पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलातून मोठ्या प्रमाणात माकडे दरवर्षी गावाकडे येतात. यावर्षी गावात माकडांचे एक मोठे टोळके दाखल झाले असून या माकडांनी छतावरील कौलारू घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गावातील बहुतांश घरांवर कवेलू व टीनपत्रे आहेत, यावर माकडे उड्या मारून पूर्णपणे नासधूस करीत आहेत.केवेलू घरांचे संपूर्ण पणे नुसकान केलें आहे. तर या उन्हाळ्याच्या दिवसांत महिला कुरडया, शेवया, पापड, तसेच डाळ, गहू,ज्वारी बाजरी यांना उन्हात वाळू घालतात. तर याचा फायदा घेवून माकडे घराच्या गच्चीवर पायऱ्या मार्गे चक्क घरात शिरून घरातील सामानाची नासधूस करीत आहेत. तर घरातील सदस्यावर हल्ले सुद्धा करू शकतात,तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे.वनविभागाने या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा,अशी मागणी धामणा बु येथील ग्रामस्थ करीत आहेत.
