प्रतिनिधी , कोलापूर : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आल जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला
