प्रतिनिधी , पंढरपूर : आज पासून विधानसभेचे सुरू झाले असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासह राज्यातील २० प्रश्नानाचे बॅनर विधानभवनात घेऊन जाताना महाविकास आघाडी सरकार ने आवडल्याचा निषेध पंढरपूरातील धनगर समाज बांधवानी केला आहे.
विधानसभा अधिवेशन फक्त दोन दिवसाचे असून यातही राज्यातील जनेतचे प्रश्न मांडण्यासाठी सरकार अडवत आहे.
असा धनगर समाजाचा आरोप आहे. राज्यातील महत्वाचे २० प्रश्न घेऊन आमदार गोपीचंद पडळकर हे विधानभवनात जात असताना त्यांना महाविकास आघाडी सरकार ने अडवले आहे. सरकार मुस्कटदाबी करत असून यांचा निषेध पंढरपूरात धनगर समाजाचे प्रा. सुभाष मस्के, माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ केला.
