जनतेज न्युज

अखेर त्या सावत्र आईवर बोराखेडी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, मुलाला तव्यावर ठेवून पायाला दिले होते चटके

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाण्यातील जवळा बाजार येथे 19 डिसेंबरला शारदा शिंगोटे या सावत्र आईने आपल्या नऊ वर्षीय आर्यन सचिन शिंगोटे या चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक आज घटना समोर आली होती.
तीन दिवसांपासून आर्यन घराच्या बाहेर येत नाही, असे दिसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितल्यावर हा धक्कादायक प्रकार आज शेजारचांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्या मुलाच्या मामाच्या तक्रार बोरोखेडी पोलिसांनी केली नोंद . पथकाने चौकशी करुन त्या सावत्र आई विरुध्द बाल न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बोराखेडी पोलीस करीत आहे.
सद्या पीडित बालकावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी आईला आज पोलिसाने अटक करुण न्यायालय समोर उभे केले. असता तिला जामिन देण्यात आला आहे.