जनतेज न्युज

पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातुन भारतात परतलेली मुकबधीर गीता जन्मदात्यांचा शोधात परभणी दाखल.

प्रतिनिधी , गीता अवघ्या सात ते आठ वर्षाची असतांना रेल्वे मार्गे पाकिस्तानात पोहचली होती,पाकिस्तानातील ईदी फाउंडेशन या संस्थेने गीताचा सांभाळ 15 वर्ष केला,गीताची 15 वर्ष पाकिस्तानात राहून ही आपल्या मायदेशी आणि आई वडिलांनकडे येण्याची ओढ कायम होती.

VO 1 पाच वर्षांपूर्वी गीता ही स्वर्गीय विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने पाकिस्तानातून मायदेशी भारतात आली,गीताचे दायित्व स्वतः सुषमा स्वराज यांनी स्वीकारल होते,तिच्या बालपणीच्या आठवणी च्या आधारे तिच्या माता पित्याचा शोध गेल्या पाच वर्षा पासून सुरू आहे,भारतात आल्या नंतर ज्या देवीने गीताला आई- वडील दोघांचा प्रेम -माया दिली,त्या सुषमा स्वराज्यांच्या अकाली निधना नंतर गीता पुन्हा एकदा पोरकी झाली आहे.