प्रतिनिधी , यवतमाळ : शिवसेना यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी पीक विमा कंपनीचे जनरल मॅनेजर सचिन सुरोसेला केली मारहाण. सोयाबीन अंगावर टाकून केली मारहाण. खासदार भावना गवळी यांच्या समोर झाली मारहाण.
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पीक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या पीकविमा कंपनी कडून न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला.
शिवसेनेच्या वतिने आज पीक विमाकंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेनी आपली आक्रमक भूमिका मांडली. जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्या नंतर केवळ 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कंपनी कडून मिळाली. 158 कोटी रुपये विमा कंपनी फस्त करीत आहे.
शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज स्टेट बँक चौक, यवतमाळ येथे “जबाब दो ” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
