प्रतिनिधी , मुंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर आगपाखड केली.यावर प्रतिउत्तर देत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे नुसत्या तोंडाच्या वाफा असल्याचे मत मांडले आहे.याचसोबत संजय राऊत यांनी केंद्रीय नेत्यांचे खुलासे करण्याचे केलेले वक्तव्य यावरही अतुल भातखळकरांनी प्रतिक्रिया दिली.संजय राऊत यांनी पुरावे द्यावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
