प्रतिनिधी , अमरावती : कंगना राणावत यांचं घर तोडताना मर्दानगी होती का ? कंगना राणावत यांना मुबई मध्ये येऊ देणार नाही, त्यांचं तोंड फोडू, असं म्हणताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का ? त्यामुळे शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावं स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली, कर नाही तर डर कशाला, मग डर जर असेल तर त्याबाबतीत डराव डराव राऊतांनी करू नये, अशी टिका आशिष शेलार यांनी अमरावतीमध्ये केली.
