प्रतिनिधी , मुंबई : काँग्रेसची स्थापना दिवसानिमित्त मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांच्या पदग्रहण समारंभ आज मुंबईत पार पडला.महाराष्ट्राचे प्रभारी एसके पाटील तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मंत्री असलम शेख मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. जगताप यांनी मुंबई शहर अध्यक्ष पदाचा आज पदभार स्वीकारला आहे.
