प्रतिनिधी, नांदेड : काल अजित दादा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत रुजवण्याचे आव्हान केले आहे. त्यावरती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिक्रिया घेतली असता एसटी कर्मचारी हे सध्या दुखवटा साजरा करत आहेत. गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, तरी देखील राज्य शासन आमच्याकडे लक्ष देत नसून फक्त अल्टिमेट देत आहे. आता आमची लढाई न्यायप्रविष्ट असल्याने आमचा न्यायदेव त्यावर विश्वास आहे 5 एप्रिल रोजी आमच्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची सुनावणी असून गुणरत्न सदावर्ते तसेच जयश्री पाटील हे वकील आमची बाजू मांडत असून त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे तसेच अजित दादा पवार यांनी दिलेल्या अल्टिमेट लावणी भीक घालत नाही.
