प्रतिनिधी, औरंगाबाद : आज रविवार 27 मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सुरू असताना या आंदोलनामध्ये मात्र सामान्य नागरिक कुठे दिसून आला नाही हे आंदोलन नेमके साधारण नागरिक करता होते की केंद्र शासनाच्या विरोधात होते यावेळी सामान्य नागरिक कुठे दिसला नाही.क्रांती चौकात शिवसेनेचे केंद्र शासनाच्या विरोधात पेट्रोल डिझेल गॅस अन्न धान्य तेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन.
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, आ.संजय शिरसाट माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकात केंद्र शासनाच्या विरोधात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिवसेनेच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या असून,गेल्या काही दिवसापासून केंद्राने डिझेल पेट्रोल आणि घरगुती गॅस तेल धान्य मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून केंद्राच्या या धोरणाच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसेना महिला आघाडीच्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे,केंद्र शासनाने यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन वाढत्या महागाई वरती तोडगा काढावा शिवसेनेच्यावतीने वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मोदी सरकारने 2014 मध्ये शंभर दिवसांमध्ये महागाई कमी करू म्हणून सांगितले होते अच्छे दिन येणार आहे म्हणून सांगितले होते कुठे गेले असा सवाल यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून केला.सदरील आंदोलन क्रांती चौकात आज रोजी संपन्न झाले आहे.
