जनतेज न्युज

मला उद्धव ठाकरे यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे – चंद्रकांत पाटील

काळ तुम्हाला दाखवेल कोणाची खिल्ली उडवायची

डायरी सापडली का? त्यात काही सापडलं का? हे मला माहित नाही पण मला खूप काही दिसतं

प्रतिनिधी, कोहलपुर : भातखळकर यांनी केलेली मागणी योग्यच आहे. या चौकशीतुन आता कुणी सुटणार नाही. संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण ती अंगावर येणार आहे. आमची सत्ता असताना आहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची उभारणी केली. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकचं लोकार्पण केला जाणार आहे,पण विरोधीपक्षनेते यांना देखील आमंत्रण नाही. शरद पवार येईपर्यंत जमावबंदी लावली आहे, त्यावेळी देखील जमावबंदी लावा ना

पोलीस दबाव टाकत आहेत, हे फार दिवस चालणार नाही, कोल्हापुरात देखील 8 वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी त्यांच्या बॅगा बांधून ठेवल्या आहेत.  किरीट सोमय्या हे त्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत. अजित दादा तुम्ही श्रेय घ्या पण एसटी कामगारांचा संप मिटवा असं मी चिट्टी लिहिली.  केवळ अजित दादा हेच हा संप मिटवू शकतात