प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर मनोज सांगळे यांच्यावर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे..
गुरुकुंज मोझरी येथे गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयात कार्यरत असलेले निवासी डॉक्टर मनोज सांगळे रात्रीच्या वेळी रुग्णालयातील कामकाज आटोपून त्याच्या निवासस्थानी आराम करीत असताना रात्री १२.३०सुमारास दवाखान्याच्या मागील गेटकडून अज्ञातांनी प्रवेश घेत डॉक्टरवर हल्ला चढविला..यात डॉक्टर गंभीर झालेत..दरम्यान दवाखान्यात असलेला cctv मध्ये मागील दरवाजा मधून प्रवेश केलेला हलाखोर कैद झाला आहे..घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत..या संदर्भात अधिक तपास पोलीस करताहेत..
