जनतेज न्युज

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहे : संजय राऊत

प्रतिनिधी , मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची चिरफाड केली. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याला गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. मग ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. विरोधी पक्षानंही त्यांच्या पद्धतीनं वर्षपूर्ती साजरी केली. त्याचा मी आदर करतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधी पक्षाने टीका करावी, पण टीकेसाठी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये. मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे का जाणार नाहीत, याची संपूर्ण माहिती त्यांनी पीएमओ कार्यालयातून घ्यावी. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सूचनांचे पालन सरकार करत आहे. कदाचित भाजप हे विसरलं आहे. त्यांनी एकदा खात्री करून टीका करावी असे खडेबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला सुनावले.