जनतेज न्युज

आमचं सरकार स्थिर… निवडणूक झाल्या नंतर लिस्ट जाहीर करू -जयंत पाटील

प्रतिनिधी , सातारा : विरोधकांनी सरकारवर टीका केल्या मात्र कोरोना काळात डगमगून न जाता सरकारने निर्णय घेतले.सरकार स्थिर असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार हे फडणवीस यांच्या मनात कस येत… आमचं सरकार येणार अशी हाकाटी उठवण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असून आमचं सरकार आल्याने त्यांना अडचणी झाली असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साताऱ्यात चांगलाच समाचार घेतला…
पक्ष प्रवेशा बद्दल बोलताना त्यांनी निवडणूक झाल्यानंतर काही गोष्टी समोर येतील आणि निर्णय घेऊन लिस्ट जाहीर करणार असल्याचा गौप्य स्फ़ोट केला आहे.