जनतेज न्युज

अत्यआवाश्यक सेवा बजावणाऱ्या बस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यास आरोग्य विभागाचा हलर्गजीपणा

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड कोविड सेंटरचा हलर्गजीपणा उघड झाला आहे. मुखेड बस आगाराच्या चालक वाहकांची मुंबई बेस्ट येथे अत्यआवाश्यक सेवा पुर्ण करून मुखेड येथे परतले असताना, नियमानुसार त्यांची कोविड चाचणी करने बंधनकारक असताना. मुखेड येथील कोविड सेंटर मध्ये त्यांची तपासणी होत नाही. नियमानुसार ते मुखेड येथिल कोविड सेंटरला पत्र पाठवून सुध्दा त्यांची कोविड चाचणी होत नाही.
मुखेड कोविड सेंटर मध्ये फक्त एक महिला कर्मचारी उपस्थित असल्याने त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत होती. त्यामुळे ३५ बस चालक वाहक कर्मचाऱ्यांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांची मुखेड कोविड सेंटरची तात्काळ चौकशी करून संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ज्यामुळे इतर रूग्णांना याचा त्रास होणार नाही. यासाठी कर्तव्यावर गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.