प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकची प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने आता 8, 10 आणि 12 फेब्रूवारी 2021 रोजी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी तारखा जाहिर झाल्या प्रमाणे आज 8 फेब्रुवारी रोजी नांदेड किनवट तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अधिमाया शंकर नरोटे तर उपसरपंच पदी पुणेरथा नामदेव सुदेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी डी के उपचलवार यांनी दिली आहे.. पांगरी ग्रामपंचायतीचा कारभार संरपंच व उपसरपंच महिलेच्या हाती गेल्याने आणि नव्याने सरपंच पदी विराजमान झालेल्या अधिमाया नरोटे या सरपंच महिलेने गावाचा विकास कसा साधता येईल यावर भर दिला जाईल असे यावेळी त्या बोलत होत्या..
